मानसी दीक्षित (आहारतज्ञ )
वाचकहो, दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मागील चणे खावे लोखंडाचे हा माझा लेख सगळ्यांनी वाचला असेलच. त्याचाच पुढील भाग दूध प्यावे सोन्याचे हा लेख तुमच्या भेटीला आणला आहे.
दूध प्यावे सोन्याचे

दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. आपल्या सगळ्यांना माहित असेलच की जिथे स्वच्छता, आनंद, उत्साह, मांगल्य, आरोग्य असते तिथे सदैव लक्ष्मीचा निवास असतो. त्याच लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण सोन्याची पूजा करतो. तेच सोनं आपण दागिन्यांच्या रूपात आपले सौंदर्य खुलून दिसावे म्हणून घालतो. हे सोनं तुम्ही तुमच्या आहारात वापरून तुमचे सौंदर्य अधिक उत्तम करू शकता. ते कसे? सोन्याच्या सेवनामुळे आपल्या शरीरातील विषाचा व रोगांचा नाश होतो. त्यामुळे आपले शरीर सुदृढ, आरोग्यसंपन्न, उत्साही, आनंदी व सुंदर होते, म्हणून या दिवाळीला सोनं सेवन करून खऱ्या अर्थाने लक्ष्मीपूजन करूयात.
कानकं सेवनं नित्यं जरामृत्यूविनाशनम्, दृढकायाग्निकरणम् ।
( निघण्टु रत्नाकर)
सोन्याचे नियमित सेवन करण्याने वृद्धत्व येत नाही, अकाली मृत्यूची भीती राहत नाही शरीर दृढ व जठराग्नी उत्तम राहतो. (अर्थ- डॉ. श्री बालाजी तांबे.) (सकाळ, फॅमिली डॉक्टर, ४ ऑक्टोबर २०१९)
या धातूचे अजूनही काही फायदे आहेत जसे की, घाव किंवा जखम भरून येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सोन्याच्या धातूंमध्ये असते. सोनं हृदयासाठी व डोळ्यांसाठी हितकारक आहे.
हे सगळं तर ठीक आहे पण दुध प्यावे सोन्याचे हे काय? तर त्याचे असे आहे. सोन्याचे फायदे आपण जाणले. पण ते घ्यायचे कसे?
सोन्याचे दूध:- लहान मुलांना आपण दुधामधून जी बालगुटी देतो, त्याच्यात इतर सामग्रीं बरोबर शुद्ध सोन्याचा एक वेढा उगाळावा.
सोन्याचे पाणी:- सुवर्णसिद्ध जल हा प्रकार तुम्हाला माहित असेलच. शुद्ध सोने पाण्याच्या भांड्यात टाकून ते पाणी वीस मिनिटे उकळून सुवर्णसिद्ध जल तयार करता येते.
तांब (Copper)

तांब म्हटलं की, मला माझ्या आजे सासूबाईंनी सांगितलेली गोष्ट आठवते. तिचं घर पुण्यात अगदी जोगेश्वरीच्या मंदिराच्या समोर होतं. पूर्वी त्या घराच्या जवळचे जुने वाडे पाडण्यात आले. तेव्हा जमीन खोदताना त्यांना तांब्याच्या तोट्या मोठाले पाईप्स मिळाल्याचं तिने सांगितलं. त्या कशा? तर पेशव्यांनी कात्रज तलाव बांधून नळाद्वारे पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरू केला. हा इतिहास सर्वांना माहीत आहेच. तर सांगायचा मुद्दा असा की जे पाणी पुण्याला यायचं ते सर्व या तांब्याच्या तोट्या आणि पाइपमधून यायचं. ही तर पूर्वीच गोष्ट झाली पण एवढ्यातच मी वाचलं की युकेमध्ये सुद्धा सर्व शहराचा पाणीपुरवठा तांब्याच्या पाइपमधून होतो. पण coppers चे पाईप्स का?
तर तांब आपल्या शरीरात महत्त्वपूर्ण कार्य करतो. एक उदाहरण सांगते आपल्या घरात cooper wires लावलेल्या असतात. त्याच्यातून electric flow चांगला होतो. तसच आपले शरीर सुद्धा एक भलंमोठं wires (nerve) च जाळच आहे. शरीराकडून मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना व मेंदूकडून येणाऱ्या संवेदना (electric impulses).
ही सर्व प्रक्रिया neurotransmitters च्या माध्यमातून केली जाते आणि copper मुळे हे neurotransmitters बनायला मदत होते.
https://copperalliance.eu/benefits-of-copper/health/
अजून बरीच कार्ये copper च्या माध्यमातून केली जातात, जसे आपल्या हाडांची घनता (density) व त्यांची ताकद ही सुद्धा copper वर अवलंबून असते. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तांब मिळवायचं कसं?
नवीन पद्धत म्हणाल तर आजकाल copper pipes वापरून वॉटर प्युरिफायर तर तुम्ही बघितले असतीलच. शिवाय copper water bottles मिळतात. आपल्या रोजच्या आहारातून सुद्धा तांब मिळवता येतं, जसं की liver, shellfish, oysters. शाकाहारी पदार्थ म्हणाल तर बदाम, cereal, मनुका, लिंबाचे साल ह्या सर्वांमध्ये तांब असतं.