Terms to know before writing

१. गोपनीयता धोरण (privacy policy)आम्ही तुमची जी माहिती गोळा करत आहोत, ती तुम्हाला तुमची संकेतस्थळावरील  माहिती उपलब्ध करण्यासाठी गोळा करत आहोत याची कृपया दखल घ्यावी.

२. इथे प्रकाशित करण्यात येणारे लेख हे तुम्ही स्वतः लिहिणे अपेक्षित  आहे. दुसऱ्या साईट वरून नकल करण्यात आलेले नसावेत.आधी प्रकाशित असलेले लेख, इथे प्रकाशित करू नयेत तसे असल्यास सोबत त्या लेखाची लिंक जोडण्यात यावी.

३. आपल्या लेखातून कुठलाही धर्म,जात ,पंथ,लिंग,शारीरिक व्यंग याचा अपमान केला जाऊ नये ही विनंती. तसे दिसून आल्यास लेख प्रकाशित केला जाणार नाही. राजकारणाबद्दलचे तुमचे मत इथे व्यक्त करू नये अशी नम्र विनंती. देशविरोधी लिखाण येथे प्रकाशित केले जाणार नाहीत.

४. लेखासाठी प्रतिमा जोडणे बंधनकारक नाही. आमची एडिटिंग टीम योग्य ती प्रतिमा जोडेल. जर तुम्ही एखादी प्रतिमा जोडत असाल तर प्रतिमा फ्री इमेजेस साईट वरूनच घ्यावी. प्रतिमा कुठल्या संकेतस्थळावरून  घेण्यात आली आहे याचा स्त्रोत द्यावा.हे बंधनकारक आहे. स्वतःचे काही चित्र किंवा प्रतिमा जोडत असल्यास तसे नमूद करावे ही नम्र विनंती.

५. तुम्ही देत असलेली माहिती चुकीची आढळ्यास त्यास तुम्हीच जवाबदार आहेत.  भाव मराठी साईट आणि त्याचे मालक त्यास जवाबदार नाहीत.

६. तुमचा लेख प्रसिद्ध केल्यानंतर सुद्धा लेखाचे सगळे हक्क आणि टायटल्स तुमचेच असतील. तुमच्या लेखा बद्दल जर काही तक्रारी आल्या किंवा त्यांच्या सत्यते बद्दल काही प्रश्न आल्यास त्याला भाव मराठी जबाबदार राहणार नाही.

७. तुमचा लेख प्रकाशित होण्यास ३ ते ७ दिवसांचा  कालावधी लागू शकतो याची कृपया नोंद घ्यावी. तुमचा लेख प्रकाशित झाल्यावर तुम्हाला कळवण्यात येईल. तुमचा लेख प्रकाशित करायचा अथवा नाही याचा निर्णय भाव मराठी एडिटिंग टीम घेईल.