Categories
Uncategorized माझा कट्टा

करोनाचे उद्यम जगतावरील सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम

करोना नामक विषाणूने जगात कसा हाहाकार माजवला आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. करोनाचे भिन्न व्यक्तींवर, व्यापाऱ्यांवर आणि उद्यम जगतां वर झालेल्या परिणामांमध्ये कशी तफावत आहे याचं विवेचन करूया. काही उद्योग आणि रोजगार करोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत बंद पडले तर हीच प्रतिकूलता काही उद्योग जगतात अनुकूलता बनून पोषक ठरली आणि त्यांचा व्यापार वृद्धिंगत झाला.

याचं सगळ्यात ठळक उदाहरण द्यायचं झालं तर मॉल्स आणि ई-कॉमर्स हे असेल. ई-कॉमर्समुळे आणि त्यांच्या भारी सवलतींमुळे असाही मॉल संस्कृतीला थोडा फार धक्का बसला होता, पण मॉल्स बंद पडले नव्हते कारण समाजात असा एक मोठा वर्ग आहे जो ते टेक जाणकार नसल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्यासाठी आभासी/वर्चुअल खरेदी समाधानकारक व सोयीस्कर नसल्यामुळे म्हणा मॉल्स आणि दुकानांकडे आकर्षिला जातच होता. पण करोनामुळे आणि पर्यायाने आलेल्या लॉकडाऊन मुळे हे चित्र पूर्णपणे पालटलं. मॉल्स आणि दुकाने बंद पडल्यामुळे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा अशा अनेक ई-कॉमर्स कंपन्यांची चलती झाली. एकीकडे मॉल्स मधले दुकाने बंद पडून त्यांना टाळे बसण्याची वेळ आली आणि दुसरीकडे ई-कॉमर्स कंपन्यांना होणाऱ्या नफ्यात किती तरी पटींनी वाढ झाली.

माहिती-तंत्रज्ञान उद्योग जगतात आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या उद्यम जगात घरून काम करण्याची मुभा असल्याने त्याचे अनेक फायदे आणि तोटेही झाले. लोकांचा घरातून ऑफिस आणि ऑफिस मधून घरी येण्यात जाणारा वेळ, श्रम आणि पैसा वाचायला लागला. हवा आणि ध्वनी प्रदूषण काही काळाकरता का होईना कमी झाले. काम ऑनलाईन करता येऊ लागल्यामुळे भौगोलिक दृष्ट्या तुमचं कुठेही असं चालणार होतं. बऱ्याच लोकांनी या परिस्थितीचा अदमास घेतला आणि आपल्या मूळ गावी किंवा शहरी किंवा आईवडिलांकडे बस्तान हलवलं. त्यामुळे दर महिना घरभाड्यात आणि इतर खर्चात जसे वीज पाणी वगैरे बचत झाली. बऱ्याच लोकांनी तो वाचवलेला पैसा स्टॉक मार्केटमध्ये निवेश केला. पाश्चात्त्य जगात काही लोकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली छोटी घर विकुन उपनगरात मोठी घरं घेतली कारण घरून काम करणे ही संधी त्यांना करोनामुळे मिळाली होती. त्याकरता ऑफिस जवळ घर असणं हा जो एक निकष होता तो निकालात लागला. आपल्याकडेसुद्धा काही लोकांनी वाचवलेला पैसा घरात गुंतवणूक करण्यात वेचला.

घरून काम करण्याचा एक मोठा तोटा म्हणजे कामाच्या वेळा ज्या आधीच ताणलेल्या होत्या त्यांना आता काहीच निर्बंध उरलेला नाही. कनेक्टेड किंवा इंटरनेट बरोबर जोडला गेला आल्यामुळे आजकाल माणूस सतत ऑनलाईन किंवा कॉल वर असतो.

दुसऱ्या काही उद्योग जगतात याच्या अगदी विरोधी चित्र दिसते. जिथे व्यक्तीने शारिरिकरित्या कामावर हजर राहणे ही एक गरज आहे असे व्यवसाय बंद पडले. अनेक बांधकाम मजूर, कारखान्यातील मजूर आणि इतर यांचे रोजगार गेले. लहान-मोठे व्यापार करणाऱ्यांना आपल्या रोजीरोटी देणाऱ्या मूळ स्त्रोताला काही दिवस टाळे लावावे लागले.

वैद्यकीय जगात आणि त्याच्याशी निगडीत असलेल्या उद्योग जगतात जसे फार्मास्युटिकल्स, औषधांची दुकाने इन्शुरन्स कंपन्या यांचादेखील खूप फायदा झाला.

मॉल्स आणि ई-कॉमर्स याप्रमाणे आणि एक एक उदाहरण देता येईल ते म्हणजे उपाहारगृहे आणि खाद्य वितरण ॲप्स, जसे स्विगी आणि झोमॅटो. जरी उपहारगृहांचा व्यवसाय लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात कमी झाला असला तरी नंतरच्या काळात झोमॅटो, स्विगी वगैरे सारख्या खाद्य वितरण ॲप्सनी त्यांना तारून नेलं आणि काही प्रमाणात सावरायला मदत केली. अशी परिस्थिती असून सुद्धा काही उपहारगृहे कायमची बंद झाली. यात उपहारगृह आणि खाद्य वितरण ॲप्स यांच्यावर झालेल्या परिणामांमध्ये तफावत दिसून येते.
एकीकडे पुरुष आणि महिला प्रसाधन गृह बंद पडली तरी दुसरीकडे अर्बन clap सारख्या उद्योगांमधून ब्युटीशियनना रोजगार संधी उपलब्ध झाल्या.

आपल्याला जगायला आवश्यक फक्त तीन गोष्टी रोटी, कपडा और मकान या त्रिसूत्रीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू जसं फळ, भाज्या, वाणसामान या दुकानात पूर्वी जशी अमिताभ बच्चन यांच्या पिक्चरला गर्दी व्हायची तशी गर्दी झाली होत होती. संग्रह करण्याकडे मनुष्यजातीचा कल असल्यामुळे भीतीपोटी जीवनावश्यक वस्तुंचा साठा केला गेला. ज्या योगे जीवनावश्‍यक वस्तू विकणाऱ्या व्यापारांचा खूप फायदा झाला. ज्यांचे रोजगार गेले त्यांनी फळ, भाजी यांची दुकानं थाटली आणि आपला उदरनिर्वाह केला.

ऑनलाईन शाळेमुळे इतरही क्लास ऑनलाईन होऊ शकतील याची जाणीव व्हायला लागली. ऑनलाईन योगा, झुम्बा, फिटनेस क्लासेस, आर्ट अँड क्राफ्ट क्लासेस असे इतर अनेक व्यवसाय उदयाला आले. बऱ्याच गृहिणींनी डबे पुरवण्याचा व्यवसाय सुरू करून घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावला.

या सगळा बदल शक्य झाला तो संगणक/कम्प्युटर्स, इंटरनेट, स्मार्टफोन्स यामुळे. यांच्याशिवाय काय करू शकलो असतो आपण?

माणसाचा मूळ स्वभाव आशावादी असतो. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता शेवट पर्यंत त्याच्याशी झगडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. या करोनाच्या संकटात अत्यंत वाईट गोष्टी घडल्या याबद्दल अजिबात दुमत नाही पण काही अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे आपल्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडले आणि प्रत्येकाची एक नवीन जीवनशैली विकसित झाली. अशा प्रतिकूल परिस्थितीतहीआपल्याला त्या सिल्वर लायनिंग किंवा चंदेरी किनार दाखवून गेल्या. म्हणतात ना उम्मीद पे दुनिया कायम है. या म्हणीला अनुसरून आशा करूया केव्हा न केव्हा तरी हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन…..मन मे है विश्वास….

प्रिया सामंत

Categories
Uncategorized काही आठवणीतले

मला उमगलेली ‘माझी आजी’

लहाणपणी आजीफक्त ‘आजी’ होती पण आज ती गेल्यावर तिच्याबद्दल लिहिताना अधिक आदर वाटतो कारण मी आता तिला एक स्त्री म्हणून, एक सून म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून आणि अश्या अनेक नात्यांमधून समजू शकते. तिच्याबद्दल लिहिताना एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून ती मला कशी उमगली हे मला सांगायचे आहे. आता जेव्हा स्वतः कमवायला लागल्यावर ‘दाल-आटे का भाव’ समजतोय तेव्हा कळतं आजी-आजोबांनी त्याकाळी कसा संसार केला असेल!

आजीचा जन्म मूर्तीजापूरला झाला. तिच्या वडिलांची सारखी बदली होत असायची. त्यामुळे आजी बऱ्याच शहरांमधून राहिली होती. तिची आई ती दोन वर्षांची असतानाच गेली. वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांच्यापासून आजीला अजून भावंडं झाली…म्हणजे एकूण १२! आणि म्हणून आम्ही आजीला “thedozensiblings’ असे चिडवायचो. अर्थात सावत्र आईने खूप चांगला सांभाळ केला असं ती नेहमी सांगायची.पण आम्हाला मात्र 12 भाऊ-बहिणी असणे म्हणजे मजा वाटायची .”येवढे!!!!” ,“तुम्ही राखी आणि भाऊबीज कसे करायचे?” आम्ही आजीला विचारायचो. ती म्हणायची आम्हाला कधीच काही वाटलं नाही.मज्जेत घालवले दिवस!

            आजी सुरुवातीपासूनच कविता लिहिणे, सार्वजनिक ठिकाणी बोलणे, नाटक बसवणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हुशार होती. ती शीघ्रकवी पण होती. मुंज, लग्न, साठीशांत, बारसे, इ.सगळ्याच सणांवर आणि प्रसंगांसाठी तिचे काव्य तयार असे. तिचे उखाणे प्रसिद्ध होते आणि आम्हाला कौतुक वाटायचं कारण ती इंग्रजीतसुद्धा उखाणे करायची. तिचे उखाणे पत्रिकां[a1] मधून छापून सुद्धा आलेले आहेत. स्वरचित ती चाल पण लावीत असे. तिचं वाचन भरपूर   होतं. लेखनही खूप  करायची. तिला खरंतर लेखिका व्हायचं होतं पण ती पूर्ण वेळ लेखिका होऊ शकली नाही. दिवसभर नोकरी आणि घरातली कामं करून रात्री लेखन करत बसायची. शाळेत असल्यापासून एका डायरीमध्ये ती कार्यक्रमांना आलेल्या पाहुण्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ठेवायची. यात त्यावेळचे प्रसिद्ध कवी-लेखक असत. नंतर तिने बऱ्याच मोठ्या लेखकांना आणि नेत्यांना वेळोवेळी पत्रं  लिहिली  होती. यातील काही महत्वाची नावे म्हणजे कुसुमाग्रज,व्ही.व्ही.वी.वी. गिरी, नीलम संजीव रेड्डी. त्यांची आलेली उत्तरेसुद्धा ती  जपून ठेवायची.

तिचं पाठांतर जबरदस्त होतं नुसते श्लोकनव्हे, तर  तिला अख्खे ग्रंथ पाठ होते असं म्हंटलं तरी चालेल. शेवटच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमधे झोपलेली असताना सुद्धा तिलाअस्खलित श्लोक आठवत होते अस्खलित! औषधाच्या गुंगीत ती माणसं ओळखत नव्हती, पण नामस्मरणासाठी पाठ केलेले श्लोक खणखणीत आवाजात म्हणून हॉस्पिटल मधला पूर्ण स्टाफ तिच्या शुद्ध संस्कृत उच्चारामुळे आणि अस्खलित इंग्रजीमुळे तिचा चाहता झाला होता. तिने “फैन” बनवून सोडले होते.

आजी लवकर नोकरीला लागली. वयाच्या 18व्या वर्षीच रेल्वेत क्लार्क म्हणून नोकरी आधी आणि मग लग्न. तिला मिळालेल्या पहिल्या पासाच्या आनंदाचे वर्णन तिच्या तोंडून ऐकावे. किती आनंद झाला होता तिला. ती पहिला पास घेऊन दक्षिण भारताच्या टूर वर गेली होती. तिला अजून शिकायचे होते पण घरातल्या परिस्थितीमुळे तिला उच्च शिक्षण घेता आले नाही. आजी-आजोबांची भेट पुढे तिथे ऑफिस मध्येच झाली. एकाच टेबलावर बसायचे दोघे. आजीच्या कवितांमध्ये आजोबांबद्दलचे प्रेम, त्यांच्या विषयीचा आदर आणि जोडीदाराबद्दलच्या तिच्या कल्पना एका कवितेत स्पष्ट दिसून येतात

मौक्तिक माले मधली मोत्येँ

सांग सख्या रे काय म्हणाली ?

रंगीत-गंधित पुष्पे बागेमधली

सांग साजणा शी लाजली?

लग्नाबद्दल, किंवा जोडीदाराबद्दल एका कवितेत ती लिहिते :

मनी नसे तरी स्वप्नी दिसे

सत्य असे कि भास असे?

कसे दिसावे?‘तू’ मज स्वप्नी

अनपेक्षित हे यावे घडूनी ॥

परी एक दिवस तो असा उगवला

जणू भासले ‘स्वप्नच’ मजला

क्षणात स्मरले “पूर्वस्वप्न’ ते

ज्यास पाहिले त्यांना वरीले॥

मंगल दिनही तोच तोच तो

तेच तेच मज ‘पति’ लाभले

‘पूर्वस्वप्न’ हे कसे रंगले?

जीवन माझे कसे बदलले? ॥

त्यांचा प्रेम विवाह झाला. (अर्थात हा अगदी रसाळ चर्चांचा विषय) आजोबांच्या घरून खूप विरोध होता म्हणे. एकाच जातीतले असून आजोबांची आई आजी बद्दल साशंक होती. तिला घरात ‘करणारी’ सून हवी होती. आजोबांचे मूळ गाव साताऱ्याजवळ पाचवड इथे होते. ते घरात सगळ्यात मोठे होते. घरी थोडीफार शेती होती. त्यांचे वडील लवकर गेले आणि आजोबांपेक्षा खूप लहान पाच-सहा भावंडंही होती. अशा परिस्थितीमुळे पणजी आजीला घरातल्या कामात मदत करणारी सून हवी होती. नोकरी करणारी मुंबईतली “मॉडर्न’ पोरगी नको होती पण झालं लग्न. हळू-हळू आजीने सर्व घर सांभाळलं. अर्थात ती गावात राहत नव्हती. सणासुदीला सगळे एकत्र यायचे. भावंडं कधी सातारा, कधी गोवंडीला असायची. गोवंडीला छोट्याशा भाड्याच्या घरात सगळी जणं राहत होती. जागा खूप कमी पण माणसांमध्ये प्रेम खूप. आणि इथेच मला आजीचं खूप कौतुक वाटतं.

आजीच्या पिढीने खरंच खूप कष्ट घेतले असं मला वाटतं. आजच्या पिढीला तंत्र-ज्ञानाची मदत उपलब्ध आहे. सोयी आहेत, सुविधा आहेत. आजीच्या पिढीला तसं नव्हतं. आज आमची पिढी नोकरी करत असली आणि घरही सांभाळत असली तरी त्याचे काही विशेष कौतुक मला वाटत नाही. पुणे–मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सगळं विकत मिळतं. सण असला की पुरणपोळी मिळते, मोदक मिळतात. कामाला बाया मिळतात. पैसे खर्च केले की छान-छान वस्तु मिळतात. पण त्या काळी म्हणजे 1960च्या दशकामध्ये असं नव्हतं. आजी घरातलं सगळं करून सकाळी 8 ची लोकल धरून ऑफिस ला पोचायची. वरून एक सण असा नाही जो तिने केला नाही, . आणि पूर्ण निगुतीने नाही केला.गोवंडी-सीएसटी ( तेव्हा चे व्ही टी) दीड तासाचा प्रवास होता. एक लोकल चुकली तर दूसरी खूप नंतर असे. टॅक्सी करणे तेव्हा परवडण्यासारखे नव्हते. तिला लेट मार्क मिळाला तर रडायला यायचं. कामातही मिसेस काळे चोख. काम वेळेवर पूर्ण करणार. इंग्रजी अस्खलित लिहिता-वाचता-बोलता येत होतच. नोकरीमुळे ती खूप काही नवीन पण शिकली. पण राहणीमान अत्यंत साधे. कमावती म्हणून स्वतःसाठी खूप साड्या घेतल्या आहेत किंवा नट्टा-पट्टा केला आहे किंवा हिंडली आहे असे नाही. गुडघ्या पर्यंत लांब जाड काळे केस नेहमी अंबाड्यात बांधलेले असायचे.शेवटपर्यंत तिचे केस फार पांढरे झाले नव्हते ही खूप आश्चर्याची गोष्ट. नेहमी साडीच नेसायची. शेवटच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये गाउन आणि घरी माझे जुनेकुर्ते घालायला दिले होते. केस कापले होते गुंता खूप झाला होता म्हणून. डिसेंबर मध्ये जबलपूरला खूपच थंडी असल्यामुळे कुर्त्याखाली तिला स्लॅक्स घालायचो. तर आईला म्हणायची मी आज ‘मुमताज़’ दिसत आहे का! तू रोज मला एखाद्या नटीसारखी तयार करतेस.

जवाबदारीची सतत जाणीव ती ठेवून होती. सामानाला किंवा फूल-पुडीला बांधून आलेल्या दोऱ्याचे सुद्धा तिने वीणकाम करून घरात काही वस्तु बनवल्या होत्या. पै-पै जोडून तिने खूप काही जमवलं. थोडं थोडं  सोनं घेऊन ठेवायची सवय होती तिला. मला खरंच आश्चर्य वाटतं की तिला हे सर्व कसं काय जमायचं. नोकरी करते म्हणून घरकामाकडे दुर्लक्ष झालं नाही. तिच्या हातची लोणची, पापड, चटण्या एकदम ‘फेमस’. तिला ही तिखट पदार्थ खायला आवडायचं. गोड फार आवडत नव्हतं. त्यामुळे तोंडी लावण्याचे प्रकार ती खूप करायची. मला स्वतःला तिच्या हातची करडईची भाजी खूप आवडायची. मी सुट्ट्यांमध्ये पुण्याला आल्यावर ती माझ्यासाठी हमखास करायची.

माहेर असो वा सासर तिने सगळ्यांची खूप मदत केली. सगळ्यांकडे येणं-जाणं  होतं. तसं तिला माहेरपण असं खूप काही मिळालं  नाही. कधीतरी मध्ये एखाद्या दिवशी जायची माहेरी. एका कवितेतून माहेर-सासर तुलना तिने खूप छान केली आहे :

ललना मी सबला मी

माहेर किती प्रिय मला

सासर परि गृह माझे

भूषविते मी सकला ॥

नावडते कोणाही

दीन हीन जीवन जरि

स्वाभिमान जगण्याचे

‘सासर’ हे स्थान खरे ॥

स्वातंत्र्या ना तोटा

‘स्वच्छंदी ‘ जीवन हे

बंधनात सुख येथे

स्वातंत्र्ये स्त्री जगते ॥

एकीचे ‘माहेर’ ते दूसरीचे ‘सासर’जरी

एकीने दुसरीला

सावरणे प्रीत खरी ॥

लोकल मध्ये येता–जाता तिचा एक वेगळा ग्रुप झाला होता. वेळोवेळी सगळ्यांचे वाढदिवस, सगळे सण, विशेष प्रसंग साजरे करायची. नेहमी पुढाकार घेऊन करण्याचा तिचा स्वभाव होता. सगळ्यांशी संबंध ठेवून सगळ्यांसाठी करणे तिला आवडायचे.

तिला मैत्रिणी पण खूप होत्या. कार्यालयातून निवृत्त होणाऱ्या मैत्रिणीस ती लिहिते , “

प्रेम असू द्या, सुहृद जनांचे

स्नेहभाव ही जपा तयांचे

निवृत्तिची परंपरी ही

पुढती नेईल पिढी उद्याची ॥

निरोप देतो सुखी असावे

तन, मन प्रसन्न रहावे

सत्कार्याला वाहूनी घ्यावे

जीवनास सामोरे जावे ॥

आजोबा तसे खूप समंजस असले तरी त्या दोघांचे खटके पण खूप उडायचे. आजीच्या दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे तिचे कधी-कधी घराकडे दुर्लक्ष( असे त्यांचे मत, हिचे नाही!) होत असे. ती रात्री जागून लिहिते, ते त्यांना मुळीच आवडत नसे. पण तिला रात्रीच्या शांततेतच  लिखाण सुचायचे, त्याचं काय! तिच्याच शब्दात ,

“ झरझर यावे काव्यपंक्तींनी

एका मागूनी एक फिरूनी।

सुंदरशी मग माझी कविता

रसिक रंजन दावी जगता॥

आजी कामगार यूनियन मध्ये सक्रिय असल्यामुळे कामगारांची सभा भरवणे, भाषणं देणे, त्यांच्या हक्कासाठी लढणे, इत्यादी व्याप तिने करू नये असे आजोबांना वाटायचे. पण  ती  मात्र मनापासून कुठली ही अपेक्षा न ठेवता ही कामं करायची . दुसऱ्याचं दुःख तिला पाहवत नव्हतं . जेवढं शक्य होईल मदत करावी असे तिला वाटे. आजोबांना पण हेच वाटायचं पण दोघांच्या कार्यपद्धतीत  फरक होता . आणि आजी घराचा विचार नव्हती करत असे त्यांना  वाटे.  ऑफिस मध्ये पण ती बऱ्याच लोकांची मदत करायची . कोणाला कँटीन मध्ये काम लावून दे, स्वयंपाकाचे काम मिळवून दे, इत्यादी कामे बिना कुठल्या लोभ-लाभाच्या अपेक्षेने तिने केली आहेत. किल्लारीला झालेल्या भूकंपात ती प्रत्यक्ष मदतीला गेली होती. कवितेतून तिने पाहिलेली परिस्थिती तिने वर्णवली आहे :

मराठवाडयाच्या कुशीत वाढलेले

गाव किल्लारी नष्ट आज झाले

निसर्गाचा भयग्रस्त कोप झाला

आणि देशावर पडे क्रूर घाला ॥

अनेकांची घरकुले भग्न झाली

तरीही धारणी ही शांत न जाहली

सूर्य उदयाला , सूर्यास्त जणू झाला

दीन वस्त्यांचा पोळून  जीव गेला ॥

ती देवभक्त होती। कुळाचार , रीतीभाती सांभाळणे तिला आवडायचे , मनापासून दान-धर्म करायला आवडायचे. तिने आणि आजोबांनी त्यांच्या गावातल्या ग्राम-देवतेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी बरीच रक्कम खर्च केली होती. पुण्याच्या घराजवळच्या मंदिरातही दान-धर्म चाले.पण काही बाबतीत आजी ची विचारसरणी “आधुनिक’ होती आणि आजोबांचे आणि तिचे याबाबतीत पटत नव्हते. आजोबांना सोवळं लागायचं. त्यांचं म्हणणं पडे की पूजा, दान धर्म आपण शास्त्रोक्त पद्धतीनेच केला पाहिजे. तिचे म्हणणे असे की ते नेहमीच शक्य आहे असे नाही. दोघे देवभक्त पण दोघांचे दृष्टीकोन वेग-वेगळे. तिला मासिक पाळीचे चार दिवस बाजूला बसणे पटत नव्हतं. दान-धर्म योग्य माणसाला करावे असे तिला वाटे. ज्यांच्याकडे आहे त्यांनाच देण्यात काय अर्थ आहे. तिला देव माणसातच दिसायचा.तिच्या एका कवितेत तिने लिहिले आहे :

जेथे जावे तेथे मजला

दिव्यत्वाची प्रचिती येते

आपोआप मम दृष्टी वळते

त्यांना पाहूनी मस्तक लवते.

फिरण्या जाता चार पावले

सज्जन दिसती जिकडे तिकडे

भेदभाव मी विसरूनी जाते

त्यांना पाहूनी मस्तक लवते॥

याच भावनेतून तिने घरी आलेल्या सर्व माणसांचे आवडीने केले. याबाबतीत मात्र आजोबा आणि तिचे विचार जुळत होते. घरी सामान पोचवणारा मजूर किंवा रिक्षावाला कधीच चहा/पाणी/अल्पोपहार घेतल्याशिवाय गेला नाही. दोघांनी खूप माणसं जोडली. गोवंडी मध्ये जिथे भाड्याने आधी राहत होते तिथे जवळच दोघांनी मिळून नंतर घर घेतले.

 त्याकाळी हिंदीतून काम करणे सगळ्यांनाच जमत होते असे नाही. म्हणजे मुंबईत तेंव्हा हिंदी कमी बोलली जायची  आणि  कार्यालयीन काम हिंदीतून करणे सोपे  नव्हते. पण आमच्या ‘मिसेसकाळे’बाई ते काम सुद्धा आवडीने करायच्या. त्यासाठी तिने बरीच कार्यालयीन बक्षिसे ही पटकावली होती. बॉस सोबत भांडणंही होत होती. समोर स्पष्ट बोलून द्यायची. मागून गॉसिप तिने कधी केले नाही. 

‘आजी’ म्हणून तिने तसे लाड कमीच केले. बोलायची गोड. कौतुक करायची. तिच्या तोंडून‘सोनू गं, माझा सोनचाफा’ ऐकायला खूप आवडायचं. पण शिस्त कडक होती. मी भावंडांमध्ये  सगळ्यात मोठी असल्यामुळे तिच्या प्रेमाबरोबर तिचा कडक स्वभाव ही जास्त अनुभवला आहे. पुण्यात शिकायला होते तेव्हा तिच्याकडे रहात होते. आईने जरी तिच्या स्वभावाची कल्पना आधी दिली असली आणि तिच्याच मुलीच्या हाताखाली वाढलेले असले तरी तिचा ओरडा खायचे. माझ्या मैत्रिणींना वाटायचं ही आजी-आजोबांजवळ राहते म्हणजे काय मज्जा आहे हिची. आता काय सांगू त्यांना!

              लाड पुरवणे हा विभाग पूर्णपणे आजोबांकडे होता. चॉकलेट, बॉन-बॉनची बिस्किटे, खारी बिस्किटे, नाना प्रकारच्या गोळ्या आजोबा आणायचे. ती म्हणायची हे सगळं मुलांना नाही द्यायचं.  मात्र लाडू बनवून देणे, भाकरी करणे, वरण-भात खाऊ घालणे तिला आवडायचं. तिला आमच्या वह्या पहायला आवडायचं. अक्षर चांगलं काढा असं सारखी म्हणायची. अभ्यासातल्या प्रगतीवर विशेष जोर द्यायची.म्हणूनच आम्हाला ती आजोबांपेक्षा खाष्ट वाटायची. आजोबा म्हणजे निःस्वार्थ अमर्याद प्रेम, आजी म्हणजे थोडं भीतीयुक्त प्रेम असं समीकरण होतं. तिने जर काही आणण्यासाठी पैसे दिले तर तिला पूर्ण हिशोब द्यायला लागायचा. बिना मागता हिशोब दिला की ती खुश. तसं नंतर ती जस-जशी म्हातारी होत गेली तिचा कडक शिस्तीचा स्वभाव थोडा मवाळ झाला. पुण्यात राहायला लागल्यावर बऱ्याच  गोष्टी आता विकत आणलेल्या चालत होत्या. काही निवडक गोष्टीच घरात करत होती. बाकी बाहेरून आणायची. आता पैश्याच्या दृष्टीने तसे काही चिंतेचे कारण नव्हते. पगारापेक्षा पेन्शन जास्त अशी ही पिढी. आरामात जगत होती. कविता वाचन, पुण्यातील नवीन मैत्रिणी, नातेवाईक, नातवंडं  चालूच होतं. कवितांचे प्रकाशन करायची इच्छा होती. प्रयत्नही सुरू केले होते. पण आजोबांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाल्यामुळे ती थोडी खचली. ते दोघे पुण्यात शिफ्ट होउन काहीच वर्षे झाली होती. मुंबईचे घर विकून पुण्यात स्थाईक झाले होते आणि आता एकदम आरामात जगायचं होतं. पण दैवाला ते मान्य नव्हतं. आजोबा गेल्यावर आजी कवितेत लिहिते :

किती प्रेमाने त्यांच्यासाठी

सुख दुखाच्या सोसूनी राशि

दिवस सुखाचे येतील म्हणूनी

निशिदिनी श्रमले वाट पाहूनी ॥

कष्टकष्टले ना विश्रांती

लगेच का हो ही चिरशांती

वैराग्याचे जिणे ऐसे

विरह दुख मी साहू कैसे ॥

यमराजा तव उलटी रिती

कशास असली दुष्टच नीती?

मनीं किती मी व्याकूळ! व्याकूळ!

जगण्याचे मग कोठून रे बळ ? ॥

आजोबा गेल्यावरही लिखाण, वाचन चालू होतेच. पण तिला आता एकटं-एकटं वाटायला लागलं होते. लहान मुलांसाठी संस्कार वर्ग इत्यादी कामे ही चालूच होती. आमच्याकडे रहायला तिला नको वाटे. स्वतःच्या घरीच राहायचं होतं. तब्बेत उत्तम असल्यामुळे एकटं रहायला काही वाटत नव्हतं. मग तिने ते केलं जे तिला खूप दिवसांपासून करायचे होते. कुठे तरी काही कारणांमुळे ते तिला करायचे जमत नव्हते. कोणाच्या तरी ओळखीतून तिने एका मुलीला स्वतः कडे ठेवून घेतले. आम्हाला आश्चर्य वाटलं नव्हतं कारण आम्ही आजीला ओळखत होतो . पण आमचा  त्या परक्या मुलीवर विश्वास नव्हता. तिने असे एकटच अनोळखी मुलीसोबत राहवे आम्हाला पटत नव्हतं. तिचे फक्त नाव कळले होते. मराठवाडयातील कुठल्या तरी गावातून एका मागासवर्गीय कुटुंबातून ती आली होती . घरी आई वडील नव्हते. ते तिच्या लहानपणीच वारले होते. एक लहान भाऊ होता आणि म्हातारे आजी-आजोबा होते ज्यांनी हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला पुण्याला पाठवायची तयारी दाखवली होती. महिन्याला थोडे-फार पैसे ठरवून आजीने तिला ठेवून घेतले. सुरवातीला सगळ्यांना वाटलं घरातली कामं आणि आजी चा सांभाळ करण्यासाठी 11 वर्षाच्या मुलीला ठेवले आहे . पण काही महिन्यातच तसं नव्हतं हे सगळ्यांना दिसून आले. आम्ही सुट्ट्यांमध्ये गेल्यावर आम्हाला थोडा मत्सर वाटायचा. आजीच्या नातवंडांमध्ये अजून एक भर पडल्यामुळे प्रेम आटले असे आम्हाला वाटणं साहजिक होतं. आता ही कोण नवीन असे झाले होते. पण तिचे आजीवर खूप प्रेम होतं. आम्हाला आजीच्या स्वभावाचा जो भाग खाष्ट वाटत होता त्याच भागावर तिचे प्रेम होते. आम्ही आजीवर चिडायचो, ती आम्हाला आजीची बाजू घेऊन समजवायची! आजीने तिला हळू-हळू घरकाम तर शिकवलेच पण बरोबरीने लिहिणे-वाचणे, पाढे, रोजचा हिशोब ठेवणे, कपडे शिवणे, हार करणे, बैंकेची कामे इत्यादी सगळं शिकवले. सुरुवातीला ती थोडी ‘स्लो’ होती. तिला ऐकायलाही कमी यायचे. नंतर ती इतकी स्मार्ट झाली की आजी तिचे फारच कौतुक करे. ती आता आमच्या घरातली सदस्य झाली होती. आजी सोबत ती सगळ्यांकडे जायची-यायची. हळू-हळू आम्हाला ही तिची सवय झाली आणि आता मत्सर न वाटता ती हवीहवीशी वाटायला लागली. आजी जबलपूरला आली की ती पण आमच्याकडे यायची आमच्याकडे ही सगळ्यांना तिचा लळा लागला होता. वर्षातून कधीतरी ती घरी गेल्याची मला आठवते पण आता ती तशी आजीची पूर्ण वेळ जोडीदार झाली होती. जवळ-जवळ 10 वर्षे ती आजी जवळ राहिली. आम्हाला सुरवातीला जी भीती वाटत होती ती पूर्णपणे चुकीची ठरली. आजीने तिचा वयात येण्यापासून लग्नाच्या वयापर्यंत सांभाळ केला. अर्थात कोणी कोणाचा सांभाळ केला हे सांगणे कठीण आहे. आज तिचे लग्न होउन ती सुखी संसार करत आहे.आजीनेच तिचे लग्न ही लावून दिले.

आज मला वाटतं आजी खऱ्या अर्थाने ‘आधुनिक’ होती. तिने हे दाखवून दिलं की माणूस कपड्यांनी नाही, राहणीमानाने नाही तर विचारांने ‘मॉडर्न’ असतो. फार शिकलेली नसूनही ती व्यावहारिक होती. सगळ्या बंधनात असून सुद्धा ती स्वतंत्र होती. साधारण असून असाधारण आयुष्य जगली. आपल्या आयुष्यातली 85 वर्षांत तू एकही दिवस वेळ वाया घालवला असशील असे मला वाटत नाही, आजी ! तू सगळ्यांना वाट दाखवली आणि स्वतः ही वेगळी वाट चाललीस. तुझ्यासारखी तूच!

तू गेल्यापासून तुझी खूप आठवण येते गं,आजी! तुझे शब्द आम्हाला चांगले जगण्याची प्रेरणा देत असतात.

चित्तवृत्ति मम पुलकित करीते

विवेकबुद्धि जागी होते

कर्तव्याची जाणीव देते

कानमंत्र मज देऊनी जाते

आणि अचानक मजला नेते ॥

एकच अद्भुत शक्ती येते…….

  • आजीची नात
  • सौ.समृद्धी मिलिंद पटवर्धन,
  • samruddhipathak86@gmail.com

 [a1]

Categories
Uncategorized कथा-लघु कथा

म्हाद्या! भाग ३

आज खूप दिवसांनी लिहायला सुरुवात केली आहे. मागच्या म्हाद्या भाग २ मध्ये सरपंच म्हाद्यावर चिडला आणि तो त्याला घरी जाण्यास सांगतो इथपर्यंत आपण वाचले.. आता सरपंच त्याला त्याच्या छोट्या चुकीसाठी कामावरून काढेल का ? असाच प्रश्न पडला होता. आज वाचूया काय होतंय ते. 

म्हाद्या! भाग ३
चित्रकार- उमा लवंदे

म्हाद्या घरी गेल्यावर..

घरी गेल्यावर म्हाद्याने घडलेला प्रकार मालीला सांगितला. तू पण थोडी चिडली ..आणि घडला प्रकार चुकीचा आहे..पण त्यासाठी नोकरी वरून काढणं तिला पण पटलं नाही. दुसऱ्या दिवशी परत

म्हाद्या सरपंचाला जाऊन भेटला आणि पुन्हा विनवणी करून ..अशी चूक पुन्हा होणार नाही.. असा विश्वास दिला ..सरपंच रागीट असला तरी मनाने चांगला होता. त्यांनी लागलीच त्याला सांगितलं .. तुला काही मी कामावरून काढत नाही. येत जा कामावर.. 

दुसऱ्या दिवशी ..

दुसऱ्या दिवशी म्हाद्या कामावर हजर झाला. रोजच्या प्रमाणे  कामाला लागला. बाग बगीचा साफ करत होता.. तिकडून सरपंच आला.. आणि त्याला म्हाद्याला अजून चार जास्तीची काम सांगितली… म्हाद्यानी सगळी काम करून टाकली. तोपर्यंत रात्र  झाली. बऱ्यापैकी काळोख पसरला होता. सरपंच बाहेरून येणार …तेवढ्यात .. त्याचा पाय कुठेतरी अडखळला .. आणि तो पडला .. हे बघून म्हाद्या तिथे धावत जाणार… तोपर्यंत सरपंचाच्या डोक्यावर कुणीतरी मागून वार केला. सरपंच त्याला बघणार तोपर्यंत मारेकरी पळून सुद्धा गेला. तिकडून म्हाद्या धावत आला.. आणि सरपंचाला पकडलं.. आणि आधी उचलून घरात घेऊन गेला. सरपंचाला कळेचना की नक्की काय झालं? कोणी असं वार केला ते? म्हाद्याने मालकीण बाई ना घडला प्रकार सांगितला. मग लगेचच डॉक्टरांना बोलावून मलम पट्टी करण्यात आली. सुदैवाने जास्त दुखापत झाली नव्हती. मग म्हाद्या घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सरपंचांनी त्याला बोलावलं आणि विचारलं नक्की काय झालं? कोणी असा वार केला .. कारण सरपंच त्या माणसाला ओळखू शकला नव्हता.. म्हणून त्यांनी म्हाद्या ला विचारलं. तसा तो म्हणाला “म्या पन नाय बघू शकलो सईब त्यांना”. 

सरपंच त्याला म्हणाला ..तू माझा जीव वाचवला. मी तुला उगाचच बिन कामाचा समजत होतो.. तू एक काम कर.. तुझ्या बायकोला घेऊन इथे वाड्याच्या जवळच एक घर आहे.. तिथे राहायला ये. आणि उद्यापासून तू माझा खास माणूस म्हणून काम करशील आता ते बागेतली काम थांबव. साहजिक म्हाद्या ला आनंद झाला पण मनात प्रश्न आला.. आता नवीन घर म्हणजे घरभाडे पण द्यावे लागेल. त्यांनी मनातली शंका सरपंचाला बोलून दाखवली त्यावर सरपंच म्हणाला की तू त्याची काही काळजी करू नकोस ..तू माझा जीव वाचवला मी तुझ्यासाठी एवढं नक्कीच करू शकतो. तुझ्या घराचं भाड मीच देईन. तू फक्त माझ्या बरोबर रहा.

म्हाद्याला शेवटी कायमचं काम आणि राहायची सोय झाली म्हणून फार आनंद झाला. 

माली आणि म्हाद्या दोघेही नवीन घरी राहायला गेले आणि पुन्हा नव्याने नवीन स्वप्नं रंगवू लागले.

खरंतर माणसाची गरज असते किती…खूप कमी ..राहायला घर आणि पोटा पाण्यासाठी काम … बरेच लोक मात्र नश्वर सुखाच्या मागे धावताना दिसून येतात.. आता पुन्हा एकदा हे प्रकर्षानं जाणवतं.

Categories
Uncategorized अभिप्राय

करावा असाही वेडेपणा!

परवाच मला माझ्या मुलीने रात्री जेवायला बाहेर गेलेले असताना ice cream मागितलं. “आई , please, मला देना घेऊन,परत नाही मागणार”. म्हणलं ” घे ,कुठलं हवंय ते सांग “. असं म्हणून मग सगळे वेग वेगळ्या रंगाचे flavorचे विचारून आणि खूप गहन  विचार करून परत एकदा माझ्या मुलींनी strawberry ice cream ची order एकदाची दिली. बाहेर गेले कि ती icecream मागणार…. मग मी नाही म्हणणार… मग ती अगदी please ,please म्हणणार. मग मलाच वाटतं , “अरे बापरे ,आजू बाजूच्या लोकांना काय वाटेल? किती ‘दुष्ट आई’ आहे हि बाई, मुलगी एवढी please म्हणतेय तरी घेऊन देत नाहीये”. आता पर्यंत हि गोष्ट बरेचदा झालीय म्हणजे तिने मागायचं ..मग मी नाही म्हणायचं .. परत लोक काय म्हणतील हा विचार करून तिला दरवेळी सांगायचं परत नाही हं .. ती पण अगदी आज्ञाधारक मुलीसारखं हो  म्हणते. मग icecream खाऊन घरी येते. मलाही माहिती असतं ती ऐकणार नाही ,तिलाही माहिती असतं कि मी तिला आधी नाही म्हणणार आणि नंतर घेऊन देणार. कधी तरी वाटतं चुकीचं आहे, मग वाटतं हेच तर तीच वय आहे हट्ट करण्याचं ! केला थोडा हट्ट तर काय हरकत आहे.

मी पण हट्ट करतंच होते की लहान असताना …. मी तर बापरे … एक वर्ष काय झालं ,माझे आई बाबा आणि  भाऊ बाहेर फिरायला जातो असे सांगून, चांगले चार दिवस बाहेर ice cream खाऊन आले होते. मला सर्दी असल्याने आईने मला दिलं नव्हते. ती मला म्हणाली होती. तुझी सर्दी जाऊदे मग तुला पण देते. मी बापडी बरं म्हणून एकून घेतलं. मनातून मात्र  ice cream खाण्याचा विचार काही जात नव्हता. मग एक दिवस मीच आईला म्हणलं आई, मला ice cream खायचं आहे. तुम्ही मला दिलं नाही. माझं चार दिवसांचं ice cream राहील आहे. आई म्हणाली, “अगं ,चाल मग लगेच आज सर्दी नाहीये ना ..जाऊ या चल … घराबाहेर पडलो.. दुकानात गेलो , त्या बिचाऱ्या दुकानदारांनी विचारले, किती    ice cream देऊ ताई”? आई बोलायच्या आधीच मी म्हणलं ,” काका, मला एका कोन वर चार वेग वेगळ्या फ्लेवरचे ice cream द्या”. तो बिचारा गोंधळला … एका कोन वर”? त्यांनी परत मला विचारलं . आई म्हणाली, “हे काय अगं? तू धरणार कसं ? सांडेल ना ते … चार एकदम कशाला ,दोन फ्लेवर घे फार फार तर… पण माझे तर चार ice cream राहिले आहेत ना? मग परत परत कोण येणार म्हणून एकाच वेळेला चार घेऊन टाकते.. धन्य आहेस तू बाई  असे म्हणण्याशिवाय माझ्या आई कडे दुसरे काहीच शब्द नव्हते. शेवटी एकदाच हो नाही करत आईनी मला ice cream घेऊन दिलं… त्या ice cream कोनाच्या उंचीएवढंच ice cream घेऊन …. पुर्ण लक्ष ice cream वर ठेऊन ..मग वेळ मिळाला तर …मध्ये मध्ये रस्तावर लक्ष्य ठेवत …रस्तावरची सगळीच लोकं आपल्याकडे बघून गालातल्या गालात हसत आहेत …हे कळून देखील मी आपली माझा ice cream खाण्याचा कार्यक्रम यथा मति ,यथा शक्ती पार पाडत होते. शेवटी एकदा घरी येऊन पोहचलो. घरी आल्या आल्या आईने बाबांकडे तक्रार केली,”अहो, काय हट्टी मुलगी आहे हि, कसं होणार हीचं”? अशी तमाम आई वर्गाला जी काळजी तेव्हा आणि आजतागायत वाटते तशीच ती तेव्हा तिलाही वाटली.माझे बाबा अगदीच निर्विकार पणे वादळे,”चालायचंच ,लहान आहे अजून …आता कुठे सात वर्षाची आहे. बाल हट्ट आहेत…आपण पुरवायचे. हळू हळू समजेल तिला तिचंच “. असं म्हणून ते आपले त्यांच्या कामात गुंतून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा घसा दुखू लागला …तेव्हा मला कळलं माझे बाल हट्ट ..मलाच कसे नडले ते …असो. खरंतर हेच सगळं मी पुन्हा जेहाद अनुभव आहे. फक्त यावेळेस आईच्या चष्म्यातून. 

खरंच पण आता कधी कधी वाटतं काय तो वेडेपणा … मग दुसऱ्याच क्षणाला वाटतं …असे ना का ..जोपर्यंत या गोष्टी दुसऱ्याला अडचणीत आणीत नाहीत…तोपर्यंत असा वेडेपणा करायला काय हरकते? आधी रस्त्यानी एकटच कुणीतरी बडबडताना दिसलं कि वेगळंच काहीतरी वाटायचं पण आता जवळपासचे सगळीच लोक एका हातात मोबाईल आणि कानाला इअरफोन लावून  रस्त्यानी एकटेच बडबड करताना दिसतातच कि! आम्ही बहीण आणि भाऊ अजूनही एकत्र आलो कि घरी अगदी जोकवर जोक सुरूच असतात तेव्हा कुठे वाटतं.. आज काय वेड्यासारखं हसलो. एकदा का मोठे झालो ,घर,नोकरी,संसार यामध्ये रमलो कि लहानपण आणि त्यातुनही त्यातलं निरागस,नि:स्पृह जगणं विसरून जातो आपण सगळेच.मला सुद्धा कधी कधी वाटतं ,अरे काय हे ,किती बोर होतयं … मग मी आणि माझी मुलगी दोघीजणी मिळून सापशिडी खेळ, आवाज बंद करून गाण्यांचे व्हिडीओ लाव आणि त्याच्यावर दुसरी कुठलीतरी गाणी आपणच म्हणायची, कुणाची तरी नक्कलच करून दाखव ,नाहीतर चक्क कधी कधी सिन्ड्रेलाला प्रिन्स च्या ऐवजी स्पायडरमॅन,सुपरमॅन किंवा दुसरा कुठल्या तरी गोष्टीतला हिरो भेटला असता तर … ती गोष्ट पुढे कशी तयार झाली असाही खेळ खेळतो त्यांनी मुख्यतः आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. अश्या काहीश्या गमती जमती आम्ही करतो.

मोठे झाल्यावर आपोआपच आपण आपल्यातलं ते वेडेपण विसरतो पण कधी कधी हेच वेडेपण आपल्याला शहाणपण शिकवून जातं. आयुष्य खऱ्या अर्थानं जगायला शिकवतं. माणसांची खरी ओळख करून देतं. आपण सगळेच जण आपल्यातलं ते लहानमुलं जिवंत ठेवू शकलो तर किती छान होईल नाही. लहान मुलं कशी मस्त असतात ,ना जगाची भीती, ना उद्याची भ्रांत, कोण काय म्हणेल याचा विचार त्यांच्या मनाला देखील स्पर्श करत नाही. बिनधास्त असतात अगदीच …म्हणून त्यांना ताण नसतो कसलाच. आपण मोठे मात्र सतत कुठल्यातरी विचारांनी ग्रासलेले असतो म्हणूनच करावा असाही वेडेपणा. Party pubbing च्या आजच्या जगात, हा थोडासा वेडेपणा तुम्हाला खूप रिलॅक्स करून जातो. म्हणूनच मी म्हणते कधीतरी वेड्यासारखं वागून त्यातलं शहाणपण अनुभवून पहा. बघा त्यातही एक वेगळीच मजाय.

आज हे सगळं वाचल्यावर तुम्ही म्हणाल कदाचित “ हे सगळं काय लिहिलं आहे आज, थोडी फार विसंगती दिसते आहे लिखाणात … आज कुछ जम्या नहीं। खुशाल म्हणा … 

रोज रोज चांगलंच लिहून मला पण आज खूप बोर होत होतं ,नवीन काही लिहायला सुचत नव्हतं … 

मग ,आज  मनात आलं … आज लिहिण्यातही असाही काही वेडेपणा करावा… मग वाटलं बघूया तरी try करून. नवीन काही सुचलं तर सुचेल उद्या . तेव्हा उद्याच उद्या बघू असा विचार करून लिहायला बसले.. आणि हा लिखाणातला वेडेपणा  तुम्हाला सादर केला. समजून घ्याल अशी अपेक्षा. 

Categories
Uncategorized

लेख, या मध्ये फोटो कसा घालावा

आपण एक छानसा लेख लिहून भाव मराठीच्या वेबसाइट वर submit करता आणि त्याला साजेसा असा एखादा फोटो घालायचा असतो पण तो घालायचा कसा? हेच समजत नाही. हे wordpress चे नवीन gutenberg एडिटर असल्यामुळे बऱ्याच लोकांना त्याची सवय झालेली नाही.

तर आता ह्या वेबसाइट वर फोटो कसा अपलोड करायचा ते पाहूया.

१. तुमच्या प्रोफाइल मध्ये गेल्या नंतर नवीन लेख जोडण्यासाठी पोस्ट option सिलेक्ट करा.

२. इथे आपण ३ प्रकारे फोटो घालू शकतो . पानाच्या डाव्या कोपऱ्यात + चा चिन्ह आहे तिथून.

३. ज्या block मध्ये आपण लिहीत आहात तिथे तीन उभे टिम्ब दिसतील, त्या वर क्लिक केल्या नंतर, ब्लॉक च्या आधी किंवा नंतर फोटो कुठे घालायचा आहे हे ठरवावे आणि त्याची निवड करावी.

४. अजून एक पर्याय म्हणजे लेखाच्या मध्य भागी + चिन्ह दिसते त्यावर क्लिक करा.

५.शक्यतो free sites वरून फोटो घालण्याचा प्रयन्त करावा. स्वतः चे काही फोटो घालणार असेल तर त्यांची थोडी माहिती caption मध्ये लिहा आणि जर कुठला फोटो असा आहे जो free आहे कि नाही ह्याची शंका असेल तर तो फोटो जेथून घेतलेला आहे तिथली link द्या.

अजून सविस्तर माहिती साठी खालील विडिओ पहा.

Categories
Uncategorized

पहिला लेख भाव मराठी वर कसा submit करावा

तुम्ही भाव मराठी वर रजिस्टर झाल्या नंतर, लेख कसा सबमिट करावा? असा प्रश्न जर पडला असेल. तर हा लेख आणि ह्या बरोबर असलेला विडिओ नक्की पहा. 

भाव मराठी ह्या website वर आलात कि, लॉगिन करा. 

लॉगिन झाल्या नंतर तुम्ही तुमच्या profile ला येऊन पोहोचता. 

तिथे वरती काळ्या पट्टीवर नवीन असा टॅब दिसेल , त्यावर क्लिक करा. 

लेख आणि मीडिया ह्या मध्ये लेख निवडा. 

आता लेख सबमिट कसा करावा? ते बघूया. मी नेहमी माझे लेख Word किंवा Google docs मध्ये लिहिते, ह्याने मला site वर फक्त copy + paste करायचे काम राहते . तुम्ही तुमचा लेख directly site वर  देखील लिहू शकता. 

आधी आपल्या लेखाचे शीर्षक लिहा – Title ह्या ठिकाणी. 

मग जो लेख आहे. तो खाली लिहा. 

सगळा लेख लिहून झाला कि, त्यात editing करू शकता. जसा कि text चा रंग बदलणें, फोटो घालणे, heading घालणे इत्यादी. 

हे झाल्यानंतर category सिलेक्ट करा आणि पब्लिश click करा. हा लेख एडिटर्स एकदा नजरे खालून घालून पब्लिक करतात. ह्या साठी २४-४८ तास लागू शकतात ह्याची कृपया नोंद करावी. 

हा लेख आता अपलोड झाला आहे. गंमत म्हणजे त्यात तुम्ही अजूनही  editing करू शकता! 

Categories
Uncategorized

भाव मराठी साठी मराठी भाषेत type करण्याची सोपी पद्धत

मायबोली मराठीत लिहायला, वाचायला सगळ्यांनाच आवडत आणि का नाही आवडणार? आपण विचार ज्या भाषेत करतो. त्या भाषेत लिहिणं सोपं असतंच नाही का! पण सध्याच्या online जगात आपल्या भाषेत लिहायच म्हणलं कि, जरा बिचकायला होतं. भाषेवरच्या प्रभुत्वाच्या शंकेमुळे न्हवेतर, सध्याचं सगळं तंत्रज्ञान इंग्रजीत असल्यामुळे, ते वापरून आपल्याला मराठीत लिहिता येईल का? ह्या शंकेने, तर बऱ्याच लोकांना mobile वरुन लिहिणे इतके सोपे वाटत नाही आणि computer किंवा टॅब वरून कसं लिहावे? हे माहित नसते. अश्याच काही अडचणींच निरसन करण्यासाठी हा लेख वाचा.

मराठीत टायपिंग करण्याची सोपी पद्धत

  1. https://www.google.com/inputtools/try/ हया website ला जा.
  2. क्रोम किव्हा अँड्रॉइड एक्स्टेंशन download करा.
  3. आपली भाषा, म्हणजेच मराठी निवडा.
  4. म  अस अक्षर तुमच्या ऍड्रेसबार च्या शेजारी दिसेल.
  5. त्याला सिलेक्ट करा. Select केला कि त्याचा रंग निळा होतो.
  6. आता तुम्ही भाव मराठी वर सहज type करू शकता.

तुम्ही बोलून किव्हा मराठी dictation ने सुद्धा type करू शकता.ह्या साठी खालील पद्धत वापरा

Visit https://speechnotes.co/  

इथे मराठी भाषा सिलेक्ट करा.

Mike चे चिन्हं दाबा आणि बोलायला सुरुवात करा.

हि पद्धत वापरतांना शक्यतो mike असलेला headset वापरा आणि शांत ठिकाण निवडा, म्हणजे mike ला तुमचे उच्चार व्यवस्थित कळतील.

सविस्तर माहीती साठी खालील विडिओ पहा.

How to write in marathi using google input tool and speechnotes

आणि हो! भाव मराठी वर रजिस्टर करून लेख लिहायला विसरू नका! 

Categories
Uncategorized

भाव मराठी वर नवीन सभासदांनी कसे रजिस्टर करावे

नमस्कार मित्र मैत्रिणींनो!

भाव मराठी हि वेबसाइट आपल्या सर्व मराठी भाषिकांना आपल्या मनातील गोष्टी अगदी  मोकळ्या पणाने लिहिता याव्यात ह्यासाठी सुरु केलेली एक कल्पना आहे. बऱ्याच लोकांनी आत्ता पर्यंत रजिस्टर करून स्वतःचे लेख, कविता, मते, आठवणी आमच्या बरोबर share केल्या आहेत.

तरी काही लोकांना रजिस्टर होत असताना अडचण येऊ शकते, किंवा काही शंका असतील, ह्याकरिता आम्ही हा एक विडिओ बनविला आहे जो ती प्रक्रिया तुम्हाला दाखवेल. 

स्टेप्स 

१. भाव मराठी वेबसाइट वर जा – www.bhavmarathi.com 

२. इथे वरील ठिकाणी असलेल्या रजिस्टर ह्या बटण वर क्लिक करा 

३. फॉर्म भरून सबमिट करा 

४. Privacy टॅब क्लिक करा आणि रजिस्टर म्हणा

५. हे झाले कि तुम्हाला तुमच्या प्रोफाइल पेज वर नेले जाईल 

६. तिथे काळ्या पट्टीवर नवीन असा टॅब आहे, त्यामध्ये लेख असा टॅब आहे त्याला क्लिक करा आणि आपला पहिला लेख सबमिट करा.  

How to register on Bhav marathi website
भाव मराठी नवीन registration

हा विडिओ बघून जर काही शंका असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल वर contact@bhavmarathi.com येथे कळवा किंवा खाली कंमेंट लिहून सांगा.

Categories
Uncategorized कविता

बदल

बदल करता करता सारच गेलं बदलून,
सुखसोयींच्या जमान्यात जुनं सगळंच गेलं वाहून ।

प्लास्टिकच्या नळातून वाहताना पाणी गेलं सरून,
विहिरीवरच रहाट मात्र गंजत राहिले जागा धरून ।

कागदी फुलांनी जागा घेतली खऱ्या फुलांना बाजूला सारून,
डायनिंग टेबलंच्या जमान्यात पाट सुद्धा जमा झाले अंधाऱ्या खोलीत भिंतीला धरून ।

तव्यावरची भाकर गेली कुठल्या कुठे विरून,
दुकानातल्या पिझ्झ्याने सगळ्यांचीच मने घेतली आपलीशी करून ।

मोदक सुद्धा बनले मोमोज भाजीपाला आतमध्ये  सारून,
पाडावरचे  आंबे आले फंटाच्या बॉटल मध्ये भरून ।

रानातले काजू डब्यात बंद झाले भाव वदारून,
बदल करता करता सारच गेलं बदलून
सुखसोयींच्या या जमान्यात सुख मात्र गेलं विरून !!!

Categories
Uncategorized कविता

खेळ-भांडे

कड़क उन्हाळा न भयान शांतता..!
आज ही विचारात आठवनीत एकांतात गावातील शाळेत जाऊन बसलो..!

शाळा बंद त्या मुळे शांतता..
बसून वेगवेगळा विचार येत होता..

आजूबाजूला कोनी च नव्हतं,कधी पापनी लागली न कधी झोपलो कल्पनाच नाही..!
कुठला तरी आवाज कानावर पडला..
तोच झोप उडाली,थोड्या अंतरावर.. २-३ चिमुकले खेळत होती..त्यांचा धींगाना चालू होता..
परत झोपन्याचा प्रयत्न करतं होतो पन चिमुकल्यानचा आवाज झोप उडवत होता…

शेवटी बसलो त्यांचा कड़े बघत..
२ मुली आनि १ एक मुलगा..
छोट्या छोट्या डब्या..खेळ भांडी त्यात झाडाची पानं, छोटा गैस, त्यावर भांडी..
एक छोटसं घरच आहे जनु असा खेळ..

त्यांचातला संवाद थोड़ा काना वर पडला..

“ये हा माझा नवरा..
न आम्ही शेतात जातो..
तू आमची मुलगी तू घरीच थांब..”

लगेच त्यातली दूसरी मुलगी

“ये हा माझा नवरा न तू आमची मुलगी..
न तू घरी थांब.. नाय तर मि नाय खेळत…”

त्यांचा सवांद सोडा..
त्यांच् बोलन सोडा..

किती साहजिकच घडत होत्या ना लाहनपनी त्या गोष्टी …म्हणजे घर घर म्हणजे (संसार) एक खेळच खेळायचो, पण किती निरागसतेने..
अर्थ माहित नसायचा..पण भाव होता…
तो खेळ होता न आज ति एक जबाबदारी आहे..
ति निरागसता, तो चांगूलपणा, ते प्रेम ,तो भाव, या सगळ्या गोष्टी जबाबदारी आणि शारीरिक आकर्षण..
या ओझ्याखाली दडून पडल्या..

कारणं हा खेळ आज विकत घ्यावा लागतो..
या देवानघेवानला हुंडा ही म्हणू शकतोच.!

आज बघतो तर प्रत्येक संसारात तू तू- में में ..
मानसिक, शारीरिक त्रास, पुरुषात्मक विचार, चिड चिड, संशय, दारू या सगळ्या गोष्टी आज घडत आहेत, कारण प्रत्येक गोष्टी बाबतीत आपण मनाने किंवा प्रेमाने नाही तर डोक्यानी विचार करतोय..!

वाढत्या वयानुसार विचारात बदल होतोय पण मन मात्र कमकुवत होत चाललय..

सोप्या भाषेत सांगायच झाल तर..एक दिवस संसार लाहानपनीच्या खेळासारखा जगून बघा..!
कारण ज्या वयात काहीच कळत नव्हतं माझ्या मतेतरी तिथेच प्रेम होतं ..!

धनेश खंडारे.