आमच्या बद्दल

बरेचदा असं होतं कि आपण आपलं गाव किंवा शहर सोडून दुसरीकडे आल्यावर , मराठी बोलणारी माणसं  आपलयाला भेटतं नाहीत. मग आपल्या मातीतले काही खासं  सणवार, पदार्थ याची खूप आठवण येते. आपले सणवार ,त्याला निगडित असलेल्या पुराणातील  गोष्टी आपण विसरतो. पुढच्या पिढीला त्या माहितीही होत नाहीत.  

नवीन चित्रपट,नाटक बघायला जावं कि नको असाही विचार  कधी कधी मनात असतो. लहान मुलांसाठी बोधपर गोष्टी, आरोग्य,व्यायाम याविषयी माहिती हवी असते. मग आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला ती  माहिती विचारतो. अश्याच उपयुक्त गोष्टींबद्दल तुम्हाला हवी ती माहिती इथे मिळेल. आम्ही  भाव मराठी या साईटवर ही माहिती जतन करू आणि याचा फायदा अनेक लोकांना मिळेल .पर्यायाने पुढच्या पिढीला माहिती  उपलब्ध होईल .हाच हेतू हे मराठी संकेतस्थळ सुरु करण्यामागे आहे.  

contact us at – contact@bhavmarathi.com

थोडे आमच्याबद्दल

 नेहा तांबे –

नेहाला ब्लॉग्स लिहीण्याचा अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीचा ती खूप खोलात शिरून विचार करते. चित्रपट ,नाटक आणि पुस्तक वाचन हे तिचे आवडीचे विषय. नेहाला  सोशल मीडिया मार्केटिंगचा अनुभव  आहे व ती त्या क्षेत्रात कामही करते.  

मानसी दीक्षित –

मानसी आहार तज्ञ आहे. तिला आहाराविषयी सखोल माहिती आहे. याखेरीज तिचे आध्यत्मिक वाचनही आहे.  

अमृता गोखले-

अमृताला ब्लॉग्स लिहिण्याची आवड आहे.नवीन माहिती गोळा करणे. लहान मुलांशी संवाद करणे. एखादा  विषय चांगला वाटला तर त्या विषयाचा अभ्यास करण्याची तिची तयारी असते.  

विशेष आभार

सौरभ गाडगीळ यांनी अभिनव  कला महाविद्यालयातून फाइन आर्ट्‌स व सी. डॅक. मधून अनिमेशनचा अभ्यास पूर्ण केला व पदविका मिळवली आहे. यांना मूर्तिकलेतही विशेष आवड आहे. यांनी “भाव मराठी” साठी लोगो डिझाइन केले आहे. त्यांचे डिझायनिंगचे काम  बघण्यासाठी  खालच्या लिंकवर क्लिक करा. http://saurabhsgadgil.wixsite.com/saurabhgadgil